Advertisement

माजलगावच्या महिलेचा रेल्वेखाली येवून मृत्यू

प्रजापत्र | Saturday, 05/03/2022
बातमी शेअर करा

बीड दि.5 मार्च – माजलगाव (Majalgoan) येथील 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना 5 मार्च रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मानवत रोड रेल्वे स्थानकात (Railway Station) घडली. धावत्या रेल्वेत चढत असताना तोल गेल्याने रेल्वे खाली येऊन महिलेस जीव गमवावा लागला.

( Majalgaon woman falls under train and dies; Accident while trying to board a running train. )

 

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, माजलगाव येथील अब्दुल समद शेख आणि त्यांच्या पत्नी शेख राफत बेगम या 5 मार्च रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तपोवन एक्सप्रेस (Tapovan Express) ने मुंबई येथे जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर आले होते. स्थानकात पोहचताच तपोवन एक्सप्रेस मध्ये आरक्षित बोगीत बसले.

 

 

परंतू आपण चुकीच्या बोगीत बसलो आहोत असे लक्षात येताच ते परत खाली उतरून दुसऱ्या बोगीत जाण्यासाठी निघाले. मात्र नेमके याच वेळेस रेल्वे निघाली. यावेळी चालत्या गाडीत बसण्याचा प्रयत्न हे दापत्य करत होते. त्याचवेळी महिलेचा तोल जाऊन रेल्वे खाली पडल्याने  झालेल्या  अपघातात (Accident) गंभीर जखमी झाल्याने  त्यांचा जागीच मृत्यू झाला.

 

 

मानवत येथील शहरातील ग्रामीण रुग्णालयात मृत महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले. पती समोरच पत्नीला आपला जीव गमवावा लागल्याच्या घटनेने मानवत शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचे वृत्त माजलगाव शहरात येताच हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement