Advertisement

ड्रिल मशीन चा करंट लागून तरुणाचा मृत्यू

प्रजापत्र | Thursday, 03/03/2022
बातमी शेअर करा

गेवराई: तालुक्यातील राहेरी येथे ड्रील मशिनच्या साह्याने सुतारकी चे काम करत असताना मशीन चे वायर कट होऊन मशीन मध्ये करंट उतरल्याने दि. 3 रोजी सोमनाथ रायमल (वय वर्ष 22) या तरुणाच्या शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.

 

याबाबत माहिती अशी की सोमनाथ अभिमन्यू वय (वर्ष 22) हा गेल्या कित्येक वर्षापासून सुतारकीचा व्यवसाय करत असून आज काम करत असताना गुरुवार रोजी दुपारी दोनच्या दरम्यान ड्रिल मशीन च्या साह्याने होल पाडत असताना अचानक ड्रिल ची वायर कट होऊन मशीनला चिटकल्याने व मशीन हातात असल्याने विजेचा करंट संपूर्ण शरीराला लागल्याने सदर तरुणाचा काम करत असतानाच विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली असून सदर तरुणाच्या मृत्यू बद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement