Advertisement

माझे शब्द लिहून ठेवा

प्रजापत्र | Wednesday, 02/03/2022
बातमी शेअर करा

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एसआयटीने आपला चौकशी अहवाल सादर केला आहे. त्यात आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज नव्हते असे एसआयटीने म्हटले आहे. त्यानंतर आता राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आर्यन खान प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आर्यन खानचे कोणत्याही ड्रग्ज रॅकेटशी संबंध असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचेही एनसीबीच्या एसआयटीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे एनसीबीने कट रचून आर्यन खानला अडकवण्याचे प्रयत्न केले. असे टीकास्त्र राऊत यांनी केले आहे. ते आज पत्रकारांनी बोलत होते.

 

पुढे राऊत म्हणाले की, "जे मोठ्या वार्ता करतात, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करतात, ते सर्व जेलमध्ये जाणारच. महाराष्ट्र सरकार, येथील तपास यंत्रणा आणि पोलिस अनेक गोष्टींचा तपास करण्यासाठी सक्षम आहेत." नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यात आला आहे. ज्यावेळी मी माझी पहिली पत्रकार परिषद घेतली, त्यावेळीही सांगितले होते की, बाप-बेटे जेलमध्ये जाणार. आतापर्यंत तुम्ही इतरांना धमक्या देत होता, याला जेलमध्ये पाठवीन, त्यांना जेलमध्ये पाठवीन. मग तुम्ही अटकपूर्व जामीनासाठी धावपळ का करताय? आतापर्यंत कोणताही गुन्हा दाखल नाही. कोणत्या गुन्ह्यातंर्गत गुन्हा दाखल होणार, याची स्पष्टता नाही. पीएमसी बँक घोटाळ्यात तुम्हाला अटकेची भिती वाटत असेल, तर तसे सांगा, मी जे साडेतीन म्हणालो, ते तुम्ही मोजत राहा." असे म्हणत संजय राऊत यांनी सोमय्यांवर हल्लाबोल केला.

 

...हे सगळे तुरुंगात जाणार

पुढे ते म्हणाले की, "त्या साडेतीन लोकांची नावे जाहीर केली, तर ते अटकपूर्व जामिनासाठी जातात. जसजशी त्यांना अटक होईल, तस-तशी माहिती तुम्हाला समजेलच. पण माझे शब्द लिहून ठेवा, हे बाप-बेटे आणि इतरही काही लोक, जे मोठमोठ्या गप्पा करतात, ते सगळे तुरुंगात जाणार आहेत. हे एक प्रकरण नाही. अनेक प्रकरणे आहेत, ज्यामध्ये हे बाप-बेटे जेलमध्ये जाणार आहेत. त्याच्याबरोबर अनेक अधिकारी, केंद्रीय तपास यंत्रणांनी जे घोटाळे करुन ठेवले आहेत. यातली काही प्रकरणे मी पंतप्रधान कार्यालयाकडे सुपूर्द केली आहेत. काही पुराव्यासह माझ्याकडे आहेत. अधिवेशन संपले की, मी समोर येऊन सांगेल. असे राऊत म्हणाले.

 

माझे शब्द लिहून ठेवा.
"आर्यन खान प्रकरणात एसआयटीनं सांगितलं की त्या मुलाकडे ड्रग्ज सापडलेच नाही. असा बनाव आमच्या प्रत्येकाच्या बाबतीत केला जात आहे. हे उघड होईल. आता मी समोर आलो आहे. आत्तापर्यंत मी यात पडलो नव्हतो. आता मी सगळ्यांचे मुखवटे उतरवून त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही. माझे शब्द लिहून ठेवा." असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

 

Advertisement

Advertisement