Advertisement

मुंबई इंडियन्ससह अन्य संघांचे कोणाविरुद्ध किती सामने होणार

प्रजापत्र | Friday, 25/02/2022
बातमी शेअर करा

मुंबई: इंडियन प्रिमियर लीग 2022 च्या शेड्यूलची घोषणा झाली आहे. 26 मार्चपासून सुरु होणाऱ्या स्पर्धेत दहा संघ खेळणार आहेत. यावेळी प्रत्येकी 5-5 संघांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. आयपीएलच्या पहिल्या ग्रुपमध्ये मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे संघ आहेत. दुसऱ्या ग्रुपमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज, सनरायजर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आहेत. यंदा मुंबई आणि पुण्याच्या चार स्टेडियममध्ये आयपीएलचे सामने  होणार आहेत. सर्वाधिक 20-20 सामने वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहेत. ब्रेबॉर्नवर 15 सामने होतील. पुण्याच्या स्टेडियमवर 15 मॅचेस होतील.

 

आयपीएल 2022 च्या फॉर्मेटमध्ये बदल होणार आहे. फॉर्मेटच्या हिशोबाने लीग स्टेजमध्ये एक संघ चार संघांविरुद्ध प्रत्येकी एक-एक सामना खेळणार आहे, तर पाच संघाविरुद्ध प्रत्येकी दोन-दोन सामने खेळणार आहे.

 

मुंबई इंडियन्सचा संघ कुठल्या संघाविरुद्ध किती सामने खेळणार?

मुंबई इंडियन्सचा संघ कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जायंटस आणि चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध प्रत्येकी दोन-दोन सामने खेळणार आहे. सनरायजर्स हैदराबाद, RCB, पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स विरुद्ध प्रत्येकी एक-एक सामना खेळणार आहे.

 

कोलकाता नाइट राइडर्सच्या लीग सामन्यांचं समीकरण

कोलकाता नाइट रायडर्सची टीम मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपरजायंट्स आणि सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध प्रत्येकी 2-2 मॅच खेळणार आहे. चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध त्यांचा एकच सामना होईल.

 

राजस्थान रॉयल्सचे कोणाबरोबर किती सामने?

राजस्थान रॉयल्सची टीम मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपरजायंट् आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध प्रत्येकी 2-2 मॅच खेळणार आहे. चेन्नई, हैदराबाद, पंजाब आणि गुजरात विरुद्ध राजस्थानचा संघ 1-1 मॅच खेळणार आहे.

 

दिल्ली कॅपिटल्सचं लीग स्टेजच शेड्यूल

दिल्ली कॅपिटल्स लीग स्टेजमध्ये मुंबई इंडियन्स, कोलकाता, राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपरजायंट्स आणि पंजाब किंग्स विरुद्ध प्रत्येकी 1-1 सामना खेळणार आहे. चेन्नई, हैदराबाद, बंगलोर आणि गुजरात विरुद्ध प्रत्येकी 1-1 सामना होईल.

 

लखनऊ सुपरजायंट्स कोणाविरुद्ध किती सामने खेळणार?

लखनऊ सुपरजायंट्सची टीम मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान, दिल्ली आणि गुजरात विरुद्ध प्रत्येकी 2-2 सामने खेळणार आहे. चेन्नई, हैदराबाद, बंगलोर आणि गुजरात विरुद्ध 1-1 मॅच खेळणार आहे.

 

चेन्नई सुपरकिंग्सचे कोणाबरोबर किती सामने?

चेन्नई सुपरकिंग्सची टीम मुंबई इंडियन्स, सनरायजर्स हैदराबाद, आरसीबी, पंजाब किंग्स और गुजरात विरुद्ध 2-2 सामने खेळणार आहे. कोलकाता, राजस्थान, दिल्ली आणि लखनऊ विरुद्ध 1-1 सामना होणार आहे.

 

सनरायजर्स हैदराबादची टीम मुंबई, राजस्थान, दिल्ली, लखनऊ विरुद्ध प्रत्येकी 1-1 सामना खेळणार आहे. तेच कोलकाता, चेन्नई, आरसीबी, पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स बरोबर प्रत्येकी 2-2 सामने होतील.

 

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचं गणित

बंगलोरचा संघ मुंबई, कोलकाता, दिल्ली, लखनऊ विरुद्ध 1-1 मॅच खेळणार आहे. राजस्थान, चेन्नई, हैदराबाद, पंजाब आणि गुजरात विरुद्ध 2-2 सामने खेळणार आहे.

 

पंजाब किंग्सचे कोणाबरोबर किती लीग सामने होणार?

पंजाब किंग्सची टीम दिल्ली, चेन्नई सुपरकिंग्स, हैदराबाद, आरसीबी आणि गुजरात विरुद्ध 2-2 मॅच खेळणार आहे. मुंबई, कोलकाता, राजस्थान आणि लखनऊ बरोबर प्रत्येकी 1-1 सामना होणार आहे.

 

गुजरात टायटन्स कोणाविरुद्ध किती सामने खेळणार?

गुजरात टायटन्सची टीम मुंबई, केकेआर, राजस्थान आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 1-1 सामना खेळणार आहे लखनऊ, चेन्नई, हैदराबाद, पंजाब विरुद्ध 1-1 सामना होणार आहे.

 

 

गट-अ

  • मुंबई इंडियन्स
  • कोलकाता नाईट रायडर्स
  • राजस्थान रॉयल्स
  • दिल्ली कॅपिटल्स पंजाब किंग्ज
  • लखनऊ सुपरजायंट्स

गट-ब

  • चेन्नई सुपर किंग्ज
  • सनरायझर्स हैदराबाद
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
  • गुजरात टायटन्स

Advertisement

Advertisement