मुंबई-केंद्रीय तपास यंत्रणांची पोलखोल आपण करत राहू, तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारही समोर आणू, त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, नवाब मलिक यांची २० वर्षांनी का चौकशी केली जातेय? असा सवालही यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "नवाब मलिक असतील किंवा आमच्यासारखे खूप लोक आहेत. जे सातत्यानं बोलत आहेत. असत्याचा पर्दाफाश करत आहेत. मुखवटे ओरबाडून काढत आहेत. सत्य बाहेर काढत आहेत. त्यांच्यामागे आता देशभरात ईडी, सीबीआय लावलं जात आहे. नवाब मलिक यांना आज सकाळी ईडीचे लोक घरी आले आणि घेऊन गेले. ठिक आहे. चौकशी होईल आम्ही वाट पाहतोय. नक्कीच संध्याकाळी ते घरी येतील. आताच माझं वरिष्ठ स्तरावर बोलणं झालं. महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्याला केंद्रीय तपास यंत्रणा घरी येऊन घेऊन जातात. चौकशी होऊ शकते एखाद्या गोष्टीची. चौकशी पण कशी हे 20 वर्षांनी करत आहेत. याबाबत राऊत यांनी तपास यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
बातमी शेअर करा