परळी - राष्ट्रीय कृषी योजने अंतर्गत मंजुर झालेल्या विहिरीचे उर्वरित ६० हजार रुपयांचे बिल काढण्यासाठी परळी पंचायत समिती मधील कृषी विभागचा विस्तार अधिकारी संजय विठ्ठलराव पालेकर याने ५ हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती चार हजार रुपये देण्याचे ठरले.
याबाबत तक्रार प्राप्त झाल्याने बीडच्या एसीबीने सापळा रचला. त्यानुसार मंगळवारी (दि.२२) दुपारी परळी पंचायत समिती कार्यालयात लाभार्थ्याकडून ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना संजय पालेकर याला बीडच्या एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्यावर परळी शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई बीड एसीबीचे पोलीस उपअधीक्षक रविंद्र परदेशी, पोलीस कर्मचारी हनुमान गोरे, भरत गारदे, अमोल सरसाठे, गणेश म्हेत्रे यांनी पार पाडली.
बातमी शेअर करा