बीड :- छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घराघरात पोहोचून तरुण पिढीने त्या दिशेने वाटचाल करावी, या उद्देशाने बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील इरला मजरा या छोट्याशा गावातील सटवाराम भाऊराव मात्रे यांनी ६० वर्षांपूर्वीच माळवदाच्या घरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभारला आहे. आदर्शवत संकल्पना प्रत्यक्षात आणणार्या सटवाराम भाऊराव मात्रे यांनी त्या काळी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असाच आहे. २०१३ साली त्याच्या मुलांनी नवीन घर बांधल्याच्या नंतर माळवदाच्या वाड्यावरून नवीन घरावर पुतळा स्थलांतरित करण्यात आला . १९६२ ते आजतागायत तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती ला ग्रामस्थ जमा होऊन अभिवादन करतात, तसेच या कार्क्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीही जपली जाते .
सटवाराम भाऊराव मात्रे हे इरला मजरा ता. माजलगाव येथील रहिवासी असून, लहान पणापासून शिवाजी महाराजांचे विचार त्यांनी अंगिकारले आहेत. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केल्याशिवाय ते घराबाहेर पडत नाहीत. व तसेच संस्कार त्यांनी आपल्या मुलांवरही केलेले आहेत. त्यामुळे १९६२ ला स्वत:चे घर बांधते वेळी त्यांनी शिवरायांचा पुतळाही आपल्या घरावर बसवला आहे. त्यांच्या संकल्पनेचे आणि कृतीचे सर्वांकडून कौतुक होत आहे. व तरुण पिढीला आदर्श व संस्कार देण्याचं काम त्यांनी केलं आहे
                                    
                                
                                
                              
