Advertisement

व्यापाऱ्याची आत्महत्या

प्रजापत्र | Friday, 18/02/2022
बातमी शेअर करा

परळी – ग्लास अँड फर्निचर चा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याने दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेने परळी शहरातील अरुणोदय मार्केटमध्ये खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

 

परळी शहरातील अरुणोदय मार्केट मध्ये प्रवीण मालेवार यांचे गायत्री ग्लास अँड फिटिंग हे फर्निचर चे दुकान आहे.गेल्या अनेक वर्षांपासून ते येथे व्यवसाय करतात.दरम्यान शुक्रवारी सकाळी मालेवार यांनी त्यांच्याच दुकानात गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली.

घटनास्थळी परळी शहर पोलीस दाखल झाले असून या घटनेमागे नेमके काय कारण आहे याचा शोध सुरू आहे.या घटनेनंतर मार्केटमध्ये एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी तपास तातडीने करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे .

Advertisement

Advertisement