Advertisement

नंदूरबारमध्ये एक्सप्रेसला भीषण आग

प्रजापत्र | Saturday, 29/01/2022
बातमी शेअर करा

नंदूरबार: नंदूरबारमध्ये गांधीधाम एक्सप्रेसला आग लागली आहे. नंदूरबार स्थानकात एक्सप्रेस पोहोचण्यापूर्वीच भीषण आग लागल्याने प्रवाशी प्रचंड हादरून गेले. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची एक्सप्रेसमध्ये एकच धावपळ उडाली. काही प्रवाशांनी तर घाबरून आरडाओरड सुरू केली. किंचाळ्या आणि गोंगाटामुळे एक्सप्रेसमध्ये एकच गोंधळ उडाला. भडकत जाणारी आग आणि त्यामुळे पसरलेल्या धुराच्या लोट पसरल्याने काही प्रवाशांना तर श्वास घेण्यासही त्रास झाला. स्टेशन जवळ आल्याने एक्सप्रेसचा स्पीड कमी होता. त्यामुळे मोटरमनने प्रसंगावधान राखून एक्सप्रेस थांबवली. अग्निशमन दलाच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यास सुरुवात केली आहे.

 

Advertisement

Advertisement