Advertisement

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार कोरोना पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Monday, 24/01/2022
बातमी शेअर करा

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. पवार यांनी ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे. त्याचबरोबर आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना खबरदारी घेण्याचं आणि चाचणी करून घेण्याचं आवाहनही केलं आहे.
आपल्या ट्वीटमध्ये शरद पवार म्हणतात, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचं काही कारण नाही. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. मी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी.

Advertisement

Advertisement