माजलगाव-तालुक्यातील किट्टी आडगावातील साठे नगरमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी आज (दि.१६) माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांनी अपमान केल्याने आणि दाखल केलेली केस मागे न घेतल्याने व्यथित झालेल्या अनिल उत्तम थोरात या ऊसतोड कामगाराने राहत्या घरात साडीच्या साह्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि.१५) सकाळी १२ वा. माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगावातील साठे नगर येथे घडली. याप्रकरणी अनिलची आई महानंदा उत्तम थोरात यांच्या फिर्यादीवरून रविवारी (दि.१६) पत्नी छाया, तिचा मामा विजू आत्माराम क्षीरसागर, चुलता भाऊ राहुल क्षीरसागर आणि सासू संगीता अंकुश भिसे या चौघांवर माजलगाव ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
                                    
                                
                                
                              
