Advertisement

रामकृष्ण बांगर प्रतिष्ठाणकडून पाटोदा प्रीमिअर लीगचे आयोजन

प्रजापत्र | Saturday, 08/01/2022
बातमी शेअर करा

पाटोदा -रामकृष्ण बांगर प्रतिष्ठाण आणि पाटोदा स्पोर्ट्स क्लबकडून ग्रामीण भागातील खेळाडूंच्या गुणांना वाव मिळावी यासाठी पाटोदा प्रीमिअर लीगचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भायाळा गावचे सरपंच विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी दिली आहे.विजेत्या संघाला बांगर प्रतिष्ठाणकडून ५१ हजारांचे प्रथम पारितोषिक देण्यात येणार आहे.तर व्दितीय आणि तृतीय संघाला अनुक्रमे ३१ व २१ हजारांचे बक्षीस राहिलं. तसेच उत्कृष्ट संघालाही ११ हजारांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 
                पाटोदा प्रीमियर लीगच्या नाव नोंदणीसाठी १६ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.ज्या संघाला या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांना १२ हजार प्रवेश शुल्क देणे बंधनकारक असून ३ फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होईल. तसेच तालुक्यातील संघ मालकीसाठी जे इच्छुक आहेत त्यांनी अजित हुले,जय जाधव,इलियास सिद्धीकी,राहुल कांकरिया यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाला फोटो आणि आधार कार्डच्या झेरॉक्स देणे बंधनकारक करण्यात आले.दरम्यान ही स्पर्धा चाऊस मैदान,पीव्हीपी कॉलेजसमोर पार पडणार असून यात जास्तीत जास्त संघानी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

Advertisement

Advertisement