Advertisement

धावत्या स्कूटीला लागली अचानक आग

धावत्या स्कूटीने घेतला अचानक पेट

प्रजापत्र | Thursday, 06/01/2022
बातमी शेअर करा

गेवराई-गेवराईजवळ बायपासवर एका धावत्या स्कूटीने अचानक पेट घेतल्याची थरारक घटना गुरुवारी (दि.६) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. प्रसंगावधान राखून नागरिकांनी तातडीने मदत केल्याने तरुण थोडक्यात बचावला. 

 

 

        वडवणी तालुक्यातील पुसरा येथील पंकज अंगद पवार (वय-२७) गुरुवारी दुपारी अहमदनगरहून शेवगावमार्गे गेवराईकडेआपल्या स्कूटीवरून येत होता. शहराजवळच्या बायपासवर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पंकजच्या स्कूटीने अचानक पेट घेतला. आग लागल्याचे दिसताच बायपासवरील दत्तराज हाॅटेलचे मालक संदिप मुळे , किरण घाडगे, माजी नगरसेवक गोरक्ष शिंदे, महादेव मामडे, सचिन मुळे, अनिल रामदासी यांनी धाव घेत तरुणास स्कूटीवरून खाली उतरविले.तेवढ्यात स्कूटीला आगीने कवेत घेतले. नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र, स्कूटी जळून खाक झाली.

Advertisement

Advertisement