Advertisement

रूपाली चाकणकर यांना कोरोनाची लागण

प्रजापत्र | Thursday, 06/01/2022
बातमी शेअर करा

Rupali Chakankar :  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना (Corona) रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राजकीय नेतेमंडळींभोवतीही कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना कोरोनाची लागण झाली आहे. पोस्ट शेअर करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

रूपाली चाकणकर यांची पोस्ट 
'सौम्य लक्षणे जाणवल्यामुळे कोरोनाची चाचणी केली असता माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे जाणवल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी. लवकरच मी आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन.' अशी पोस्ट रूपाली चाकणकर यांनी केली आहे. 

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे 26.538 रूग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रूग्णांच्या दैनंदिन आकडेवारीत वाढ होत आहे

राजकीय नेत्यांभोवती कोरोनाचा विळखा
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना (Corona) रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राजकीय नेतेमंडळींभोवतीही  कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील (Maharashtra Government) 12 मंत्र्यांसह विविध पक्षांतील जवळपास 70 आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.  

Advertisement

Advertisement