Petrol-Diesel Price Today : भारतीय तेल कंपन्यांनी आजसाठीचे पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Rates) जारी केले आहेत. आजही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राष्ट्रीय स्तरावर गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने आजचे नवे दर जारी केले आहेत. एकीकडे कच्च्या तेलाच्या बाजारात तेजीची नोंद झाली आहे. रात्रीच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात, जागतिक मानक ब्रेंट क्रूड फ्युचर्सची किंमत 0.39 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $ 79.29 वर पोहोचली होती.
देशात सर्वात स्वस्त पेट्रोल कोणत्या शहरात?
देशात सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेयरमध्ये विकलं जात आहे. जिथे पेट्रोल 82.96 रुपये आणि डिझेल 77.13 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. राज्य स्तरावर वाहनांच्या इंधनावर लावण्यात येणाऱ्या व्हॅटच्या (VAT) वेगवेगळ्या दरांमुळे राजस्थानमध्ये सर्वात महाग पेट्रोल-डिझेल विकलं जात आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल (Petrol) 112 रुपये प्रति लिटर आहे. महानगरांबाबत बोलायचं झालं तर दिल्लीमध्ये पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel Rate) सर्वात स्वस्त आहे. तर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल आणि डिझेल दोन्हींच्या किमतींमध्ये इतर महानगरांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. दिल्ली व्यतिरिक्त इतर सर्वच महानगरांमध्ये पेट्रोलनं शतक पार केलं आहे.
भारतीय तेल कंपन्यांनी 04 डिसेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंधन दरवाढ कायम असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळणार आहे. गेल्या दोन महिन्यांत तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नंतर अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता.