मुंबई: राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वेगाने वाढत आहे. राज्यातल्या नेत्यांना आणि मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ठाकरे सरकारमधले १२ मंत्री आणि वेगवेगळ्या पक्षातले जवळपास ७० आमदार सध्या कोरोनाबाधित आहे. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या परिवारातल्या इतर तिघांनाही कोरोना संसर्ग झाला आहे.
संजय राऊत यांच्या पत्नी, मुलगी आणि पुतणीला संसर्ग झाला आहे. घरातील सदस्यांना सर्दी, ताप आणि खोकल्याची लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे या सर्वांची टेस्ट करण्यात आली. त्यानंतर चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले . या सर्वांना सौम्य लक्षणे असल्यामुळे सध्या तरी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
बातमी शेअर करा