MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना (MPSC Candidates) खुशखबर दिली आहे. 2022 या वर्षात विविध विभागांमध्ये तब्बल सात हजार 560 रिक्त जागा भरल्या जाणार असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे. सर्वाधिक रिक्त पदे ही सामान्य प्रशासन , कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, गृह , वित्त सार्वजनिक आरोग्य, आणि वैद्यकीय विभागांमध्ये आहेत. या संदर्भातील सविस्तर रिक्त जागांची यादी 'एमपीएससी'च्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) डिसेंबर 2021 पर्यंतच्या राज्याच्या विविध विभागांकडून रिक्त जागांच्या माहिती मागवली होती. त्यानुसार राज्यात सात हतार 560 जागा रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे. या जागा 2022 मध्ये भरण्यात येतील. त्यामुळे या वर्षात ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी मिळणार आहे. राज्याच्या 25 विभागांमधील रिक्त असलेल्या पदांच्या संख्यानुसार राज्यात तिन्ही गटांच्या एकूण सात हजार 560 जागा रिक्त आहेत. त्यामध्ये ‘अ’ गटातील 1499, ‘ब’ गटातील 1245 आणि ‘क’ गटातील 1583 पदांचा समावेश आहे. या संदर्भातील सविस्तर रिक्त जागांची यादी 'एमपीएससी'च्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.