Advertisement

उद्यापासून शाळा बंद

प्रजापत्र | Sunday, 02/01/2022
बातमी शेअर करा

नवी दिल्ली-देशभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गाने काळजीचं वातावरण तयार केलंय. मागील काही दिवसांपासून झपाट्याने करोना रूग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये नव्याने ४ हजार ५१२ कोरोना रूग्ण आढळल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार पश्चिम बंगालमध्ये सोमवारपासून (३ जानेवारी) राज्यातील शाळा बंद करण्यात येणार आहेत.

 

           पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच खासगी व सरकारी कार्यालयांमधील उपस्थितीवरही ५० टक्क्यांचे निर्बंध लावले आहेत. याशिवाय पश्चिम बंगाल सरकारने दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या धर्तीवर रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंतचा कर्फ्यु देखील लावला आहे. या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी असणार आहे.

Advertisement

Advertisement