औसा प्रतिनिधी औसा औसा-लामजना राष्ट्रीय महामार्गावरील वाघोली पाटीजवळ रात्री ८ च्या सुमारास बोलेरो जीप व काळीपिवळीचा भिषण आपघात झाला.यात तिघे ठार झाले, तर दोघे गंभीर आणि १० जण किरकोळ जखमी झाले आहेत.मयत व जखमींना लातूरला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.समोरासमोर झालेल्या धडकेत काळीपिवळीचा चक्काचूर झाला तर मयतासह जखमींना दरवाजे तोडून काढावे लागले.उशीरापर्यंत मयतांची ओळख पटली नव्हती.
रात्री ८ च्या सुमारास क्रमांक एमएच २४-एफ-०९५९ क्रमांकांची काळीपिवळी जीप औश्याहुन लामजन्याकडे भरगच्च प्रवासी घेवून जात होती.तर लामजन्याहुन औश्याकडे भरधाव येणाऱ्या एमएच-३०- एए ४८०९ क्रमांकांच्या बोलेरो जीपची समोरासमोर वाघोली पाटीजवळ धडक झाली.हा आपघात एवढा भिषण होता,यात काळीपिवळी जीपचा चक्काचूर झाला तर बोलेरो १५० फुट लांब जावून खड्ड्यात पडली.यात दोघे तर जागीच ठार झाले.एकजण लातूरला उपचारार्थ नेत असताना मृत्यू झाले असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. पण मयताचे नातेवाईक सोबत नसल्याने उशीरापर्यंत नावे कळली नसल्याचेही त्यांनीच सांगितले. यात तिघे गंभीर जखमी असून १० जण किरकोळ जखमी झाले.सर्वांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे,अशी माहिती पोलिसांनी दिली.घटनास्थळी औसा पोलिसांनी पाहणी करून वाहतूक सुरळीत केली.तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी पवार यांनीही भेट दिली.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप भोवला
एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप चालू असल्याने एसटी सेवा बंद आहे.त्यामुळे प्रवासी अवैध वाहतूकतून प्रवास करत आहेत.आज ही वाहतूक प्रवाश्यांच्या जीवावर बेतली आहे.