Advertisement

देशात ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाउन लागणार?

प्रजापत्र | Thursday, 23/12/2021
बातमी शेअर करा

सध्या जगभरात करोनाचा नवा प्रकार ओमायक्रॉनने जगाची चिंता वाढवली आहे. त्यामुळे देशात, राज्यात लॉकडाउन लागणार का? कोणते निर्बंध लागणार? अशा चर्चा जोर धरू लागल्या आहेत. अशातच सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. ज्यात असं म्हटलं आहे की भारतात ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाउन लागणार आहे. काय आहे त्यामागचं सत्य? जाणून घ्या.

 

या मेसेजबद्दल पीआयबी फॅक्ट चेकने माहिती दिली आहे. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणारा हा मेसेज पूर्णतः खोटा असल्याचं पीआयबीने सांगितलं आहे. पीआयबीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, सध्या सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यात भारताने ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाउन घोषित केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र केंद्र सरकारने लॉकडाउनसंदर्भात अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.

 

असा फोटो किंवा मेसेज जर तुम्हाला आला असेल तर त्याला पुढे पाठवू नका. सोशल मीडियावरच्या कोणत्याही चुकीच्या, अफवा पसरवणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. कोणी तुम्हाला पाठवला असेल तर त्या व्यक्तीलाही याबद्दल माहिती द्या. सोशल मीडियावरच्या माहितीवर अंधपणे विश्वास ठेवू नका.

Advertisement

Advertisement