Advertisement

गेवराईत आढळले तब्ब्ल एकाच नंबरचे आठ रिक्षे

प्रजापत्र | Thursday, 25/11/2021
बातमी शेअर करा

गेवराई-शहरातील रस्त्यावर एकाच नंबरचे तब्ब्ल आठ रिक्षे धावत असल्याची माहिती डी.बी.पथकाचे प्रमुख असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई केली आहे.सध्या हे सर्व ८ रिक्षे गेवराई पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहेत. एकाच नंबरचे आठ रिक्षे पकडण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

 

            शहरातील रस्त्यावर मागील काही महिन्यांपासून एकाच कंपनीचे व एकाच नंबरचे आठ रिक्षे धावत होती. मात्र याची आजपर्यंत कोणालाच माहिती नव्हती. विशेष म्हणजे या रिक्षा मालक व चालक यांना देखील याची कल्पना नसल्याचे त्यांनी पोलिसांना जबाबात म्हटले आहे.हे आठ ही रिक्षे (एम.एच २३, टीआर -३११) क्रमांकाचे आहेत.सध्या हे सर्व रिक्षे गेवराई पोलीस ठाण्यात लावण्यात आले असून या एकाच नंबरच्या आठही रिक्षा मालक व चालक यांची चौकशी सुरु असल्याची माहिती श्री.साबळे यांनी दिली. दरम्यान या कारवाईत प्रफुल्ल साबळे, जमादार विठ्ठल देशमुख, कृष्णा जायभाये, पोलीस नाईक शरद बहिरवाळ, नवनाथ गोरे यांचा समावेश होता.

 

परमिट एकच... 

दरम्यान शहरात धावणारे आठ रिक्षे एकाच परमिटवर धावत होते का ? असा सवाल आता उपस्थिती केला जाऊ लागला आहे.गेवराईत पोलिसांच्या कारवाईने खळबळ उडाली असून सर्व रिक्षांचे परमिट होते की नाही याबाबत पोलीस तपासातून माहिती समोर येणार आहे.

Advertisement

Advertisement