मुंबई-सोमवारी (दि.२२) पहिल्यांदाच मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांकडून पत्रकार परिषद घेण्यात आली.यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले की, “२८ तारेखेपासून काही डेपोला संप आहे आणि बाकीच्या डेपोमधील कर्मचाऱ्यांचे ३ तारखेपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. प्रशासन म्हणत आहे की कुणाशी बोलावं, म्हणून आज आम्ही १३ व्या दिवशी पत्रकारपरिषद घेऊन असं सांगत आहोत की, आमचे महाराष्ट्रात २५० डेपो आहेत. प्रत्येक डेपोमधील एक- दोन कर्मचारी घेतले ना? तर आम्ही थेट शासनासोबत चर्चा करायला तयार आहोत. शासनाने वेळ द्यावा, तारीख ठरवावी आणि कर्मचाऱ्यांना बोलावं. यामध्ये कुठलीही संघटना, कुठला पक्ष आणि कुठलाही विरोधी पक्ष येणार नाही. केवळ सरकार आणि कर्मचारी असले पाहिजेत. सरकारसोबत चर्चेसाठी आम्ही तयार आहोत.”तसेच, “फक्त विलीनीकरण.. जर विलिनीकरण असेल तरच सरकारने वेळ ठरवावी आणि प्रत्येक डेपोमधून एक-दोन असे २५० लोक बोलवावीत आणि त्यांच्यासोबत चर्चा करावी
बातमी शेअर करा