गेल्या आठवडाभरापासून आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळसह दक्षिण भारतात पावसाने कहर केला आहे. आंध्रमध्ये पूर आणि पावसामुळे आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 100 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. अनंतपूर जिल्ह्यातील कादिरी शहरात शुक्रवारी रात्री उशिरा तीन मजली जुनी इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून तीन मुलांसह एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. अजूनही 4 जण येथे अडकले आहेत. बचावकार्य सुरू आहे.
जिल्हाधिकारी दिव्या एस अय्यर यांनी सांगितले की, जिल्ह्यात सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे पंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंबा धरणाव्यतिरिक्त जिल्ह्यातील कक्की-अनातोडे धरणातील पाणीसाठाही धोक्याच्या चिन्हावर आहे. प्रशासनाने जवळपास राहणाऱ्या लोकांना रेड अलर्ट जारी केला आहे.
बातमी शेअर करा