शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडीकडून तिसरे समन्स पाठविण्यात आले आहे. त्यांना 24 नोव्हेंबरला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. तर यापूर्वीही ईडीने दोन वेळा भावना गवळी यांना समन्स पाठविले आहेत.
भावना गवळी यांना ईडीने यापूर्वी दोन समन्स पाठवली होती. दुसऱ्या समन्सनुसार 4 ऑक्टोबरला भावना गवळींना 4 ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, तब्येतीचे कारण देत भावना गवळी या चौकशीला हजर राहिल्या नव्हत्या. त्यावेळी त्यांनी ईडी चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ मागितला होता. ईडीच्या तिसऱ्या समन्सनंतर भावना गवळी चौकशीला हजर राहणार का हे पाहावे लागणार आहे.
बातमी शेअर करा