Advertisement

रान डुकरांच्या बंदोबस्तासाठी कुंपनात विजेचा प्रवाह;दोन शेतकर्‍यांचा शॉक लागून मृत्यु

प्रजापत्र | Friday, 19/11/2021
बातमी शेअर करा

पाटोदा-रात्रीच्या सुमारास शेतातील ज्वारीला पाणी देत असताना एक शेतकरी विद्युत तारेला चिकटला. त्याला वाचवण्यासाठी सख्खा भाऊ मदतीला धावला असता दोघांचाही विजेच्या शॉकने मृत्यु झाल्याची घटना पाटोदा तालुक्यातील नाळवंडी येथे घडली. हुसैन फकीर शेख व जाफर फकीर शेख असे त्या मृत भावांची नावे आहेत.

       

      पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना रानडुकराच्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक वेळा प्रशासन दरबारी शेतकयांनी सांगूनही प्रशासन व्यवस्था गाकडे दुर्लक्ष करते म्हणून या भागातील शेतकरी रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. माळवडी येथील रवी ढोले यांनी आपल्या शेतातील पिकाचे रानडुकरापासून बचाव करण्यासाठी तारेचे कुंपण करून त्यामध्ये विजेचा प्रवाह सोडला होता. रात्री त्याच्या शेजारचे शेतकरी हुसेन फकीरभाई शेखव जाफर फकीरभाई शेख हे रात्रीची वीज असल्याने गुरुवारी रात्री शेतात ज्वारीला पाणी देण्यासाठी गेले होते. यावेळी हुसेन फकीरभाई शेख यांचा कुंपणाच्या विद्युत प्रवाह सोडलेल्या त्या तारेला हात चिकटला. हे पाहून त्यांचे बंधू जाफर फकीरभाई शेख हे त्यांना सोडण्यासाठी त्याठिकाणी गेले, मात्र त्यांनाही विजेचा शॉक लागला. या दुर्घटनेत दोघाचाही मृत्यू झाला. या घटनेने मोठी हळहळ व्यक्त होत असून रात्रीच्या वीजेमुळेच दोन सख्ख्या शेतकरी बांधवाचा जीव गेल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

 

 

 

 

Advertisement

Advertisement