राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या संपावर तोडगा काढण्याच्या दिशेने राज्य सरकारने पाऊले उचलल्याचे दिसत आहे. राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी एक महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीला अनिल परब, बाळासाहेब थोरात, गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत.
मि़डिया रिपोर्टनुसार, बैठकीत अनेक विषयांवर चर्चा पार पडली. त्यानंतर अनिल परब यांनी या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्दावर देखील चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्यावर चर्चा झाली असून, देवेंद्र फडणवीस यांनी काही सुचना केल्या आहेत, अशी माहिती अनिल परब यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांच्याशी यावेळी सकारात्मक चर्चा झाली असून, त्यांनी काही सुचना केल्या आहेत. अशी माहिती आहे. त्यामुळे आता तरी तोडगा निघणार? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.