Advertisement

अवैद्य वाळु वाहतुक करणाऱ्या वाहनावर कारवाई;35 लखांचा मुद्देमाल जप्त.

प्रजापत्र | Thursday, 18/11/2021
बातमी शेअर करा

गेवराई-तालुक्यातील चकलंबा पोलीसांनी अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत ३५ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

     गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील गोदावरी पात्रांमध्ये अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती चकलंबा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भास्कर नवले यांना मिळाली.त्यानुसार बुधवारी (दि.१७) राक्षसभुवन येथील गोदापात्रात जाऊन पाहणी केली असता एक हायवा गाडीमध्ये जेसीबीच्या साह्याने अवैधरित्या वाळू तस्करी केली जात असल्याचे निदर्शनास आले.यावेळी पोलीस निरीक्षक भास्कर नवले यांनी दोन्ही वाहनावर कारवाई करत ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चकलंबा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement

Advertisement