मुंबई-एसटी महामंडळाचे विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. 24 तासांत कामावर हजर राहा नाहीतर सेवासमाप्ती केली जाईल. अशी नोटीस एसटी महामंडळाच्या वतीने कर्मचाऱ्यांना बजावण्यात आली आहे. यामध्ये चालक, वाहक, लिपीक आणि टंकलेखक यांचा समावेश आहे.
कामावर रुजू व्हा, अन्यथा सेवा समाप्ती करू, असा इशारा आधीच देण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळाने दोन हजार 296 कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस पाठवली आहे. आणि 24 तासांमध्ये कामावर रुजू व्हा, अन्यथा कारवाई होईल, असा अल्टिमेटम कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे.
बातमी शेअर करा