मुंबई : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराडमध्ये सध्या एका वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. सोशल मीडिया ते प्रत्येक प्लॅटफॉर्मवर ते चर्चेत आहेत. मंगळवारी एका विमान प्रवासा दरम्यान एका व्यक्तीची अचानक तब्बेत बिघडली. त्यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. कराड मदतीकरता धावून आले. योग्य वेळेत डॉ. कराड यांनी केलेल्या मदतीमुळे त्या प्रवाशाचा जीव वाचला.
मंत्र्यांनी वाचवला प्रवाशाचा जीव
इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये सीट 12A वर प्रवास करणार्या प्रवाशाच्या आरोग्याशी संबंधित काही गंभीर तक्रारी होत्या. केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड हे देखील याच विमानातून प्रवास करत होते. त्यांना परिस्थितीची माहिती मिळताच मंत्रिपदाच्या कोणत्याही प्रोटोकॉलची काळजी न करता क्षणाचाही विलंब न करता डॉ.कराड यांनी प्रवाशाला संरक्षण देत त्यांचे प्राण वाचवले. मंत्र्यांच्या या कृत्याचे लोक कौतुक करत आहेत.
                                    
                                
                                
                              
