Advertisement

धरपकड:अमरावतीत 14 हजार जणांवर गुन्हे

प्रजापत्र | Tuesday, 16/11/2021
बातमी शेअर करा

 

 

अमरावतीत शुक्रवार व शनिवारी झालेल्या दंगलप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १४ हजार ६७३ जणांविरुद्ध २६ गुन्हे दाखल केले आहेत. त्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू असून सोमवारी सायंकाळपर्यंत पोलिसांनी १३२ जणांना अटक केली हाेती. दरम्यान, शहरातील इंटरनेट सेवा १३ ते १५ नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवण्यात आली होती. मात्र आणखी एक दिवस त्यात वाढ करण्यात आल्यामुळे १६ नोव्हेंबरलाही शहरातील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय पोलिसांकडून घेण्यात आला आहे.

 

दरम्यान, सोमवारी सकाळीच पोलिसांनी भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे, महापौरांसह अन्य पदाधिकारी अशा एकूण १४ जणांना अटक केली होती. त्यांना सोमवारीच न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.

 

चौकशीचे आदेश : गृहमंत्री

नागपूर | त्रिपुरात घडलेल्या कथित घटनेचे निमित्त करीत रझा अकादमीने राज्यात घडवलेल्या दंगलीची चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दाेषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

Advertisement

Advertisement