Advertisement

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन

प्रजापत्र | Monday, 15/11/2021
बातमी शेअर करा

इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्रकथन अतिशय प्रभावीपणे करणारे महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज सकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव पर्वती येथील त्यांच्या घरी सकाळी आठ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी बारा नंतर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

 

ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी तोल जाऊन घरात पडल्याने बाबासाहेबांना दुखापत झाली होती. त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यांना वीस दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातच त्यांना न्यूमोनिया झाल्याने प्रकृतीची गुंतागुंत वाढली होती. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचा २९ जुलै २०२१ रोजी १०० वा वाढदिवस झाला होता . त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना यांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या.

 

 

Advertisement

Advertisement