Advertisement

अमेझॉन अँप वरून तब्बल १ टन गांज्याची तस्करी

प्रजापत्र | Sunday, 14/11/2021
बातमी शेअर करा

अ‍ॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून गांजाची तस्करी करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 20 किलो गांजासह दोघांना अटक भोपाळमध्ये अटक केली आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग साईटच्या माध्यमातून विशाखापट्टनमवरून मध्य प्रदेशात कडी पत्त्याच्या नावाखाली गांजाची तस्करी केली जात होती. या ऑनलाईच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास एक टन गांजाची तस्करी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

 

याप्रकरणी सूरज उर्फ कल्लू आणि पिंटू उर्फ बिजेंद्रल सिंह तोमर या दोघांना मध्यप्रदेश पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांनी विशाखापट्टनमवरून 20 किलो गांजाची खेप अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून मागवली होती. विशेष म्हणजे गेल्या चार महिन्यांपासून हि तस्करी सुरू असल्याचे देखील बोलले जात आहे. आतापर्यंत एक टन गांजाची तस्करी झाली असून, त्याची किंमत 10 लाख रुपये इतकी आहे.

 

 

सूरज हा कडी पत्त्याच्या नावाखाली ग्वाल्हेर, भोपाळ, कोटा, आग्रा आणि इतर ठिकाणी गांजाची तस्करी करत होता. त्यात अ‍ॅमेझॉनची भागिदारी सुमारे 66.66 टक्के असल्याचे देखील बोलले जात आहे. कपड्याच्या कंपनीच्या नावाखाली हर्बल उत्पादने आणि कडी पत्ता उत्पादनाच्या विक्रेत्याच्या नावाखाली हा सगळा धंदा सुरू होता.

 

 

पोलिसांनी अटक केलेल्या या दोघांची चौकशी आणि विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या आणखी एका सहकाऱ्याचे नाव सांगितले आहे. त्याला देखील पोलीसांनी हरिद्वार येथून अटक केली आहे. दरम्यान, CAIT इंडियाने या प्रकरणाची दखल घेतली असून, अ‍ॅमेझॉन या कंपनीकडून याबाबत खुलासा मागवण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement