Advertisement

दिल्लीमध्ये प्रदूषणाचा लॉकडाऊन!

प्रजापत्र | Saturday, 13/11/2021
बातमी शेअर करा

दिल्लीतील प्रदूषणाच्या बिघडलेल्या परिस्थितीमुळे संपूर्ण लॉकडाऊन लादण्याची वेळ आली आहे. अरविंद केजरीवाल सरकारने एका आठवड्यासाठी सर्व शाळा बंद केल्या आहेत, तर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनाही घरून काम करण्यास सांगितले आहे.

 

राष्ट्रीय राजधानीत आंशिक लॉकडाऊनसारखे हे निर्णय प्रदूषणाच्या मुद्द्यावर तातडीच्या बैठकीत घेण्यात आले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हे निर्णय जाहीर केले आणि लॉकडाऊनच्या पद्धतींवरही विचार करत आहोत, असा इशारा दिला. तसेच खासगी वाहने बंद करण्याचा विचार आहे. सर्व बांधकामे ठप्प झाली आहेत.

 

जगातील सर्वात प्रदूषित शहर दिल्ली
दिवाळीनंतर खराब झालेली दिल्लीची हवा अजूनही तीव्र श्रेणीत आहे. दिल्लीची स्थिती किती वाईट आहे, यावरून तुम्हाला समजेल की, जगातील 10 प्रदूषित शहरांमध्ये दिल्ली आघाडीवर आहे. भारतातील मुंबई आणि कोलकाता या शहरांचाही या यादीत समावेश आहे. स्वित्झर्लंड स्थित हवामान समूह IQAir ने ही नवीन यादी जारी केली आहे. हा गट हवेची गुणवत्ता आणि प्रदूषणावर लक्ष ठेवतो. हा गट युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राममध्ये तंत्रज्ञान भागीदार आहे.

या यादीत पाकिस्तानचे लाहोर आणि चीनचे चेंगू शहर देखील समाविष्ट आहे. दिल्लीतील प्रदूषणाच्या वाढत्या पातळीत पंजाब आणि हरियाणामध्ये जाळणे आणि दिल्लीतील वाहनांचे प्रदूषण यांचा मोठा वाटा आहे. कोळशाच्या संदर्भात राज्य सरकारांमध्ये वाद सुरू आहे, पण तोडगा निघत नाही.

Advertisement

Advertisement