गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापट्टीच्या जंगलात आज(शनिवार) महाराष्ट्र पोलिसांच्या C-60 युनिटसोबत झालेल्या चकमकीत २६ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या चकमकीत तीन जवान जखमी झाले आहेत.
गडचिरोलीचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी ही माहिती दिली आहे. जखमी जवानांना उपचारासाठी तत्काळ हेलिकॉप्टरद्वारे नागपुरला हलवण्यत आले आहे. आज कारवाईत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख अद्याप समोर आलेली नाही. मात्र यामध्ये नक्षलवाद्यांच्या मोठ्या नेत्याचा देखील समावेश असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
जवानांकडून अद्यापही परिसरात शोधमोहीम सुरू आहे. चकमक झालेल्या ठिकाणास जवानांनी वेढा दिलेला आहे. तर या कारवाईत मृत्यू झालेल्या दहशतवाद्यांची संख्या वाढण्याची देखील शक्यता व्यक्त केली गेली आहे.
बातमी शेअर करा