Advertisement

एनसीबीची मोठी कारवाई; मुंबई विमानतळावर चार कोटींचे हेरॉईन जप्त

प्रजापत्र | Thursday, 04/11/2021
बातमी शेअर करा

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईत मोठी कारवाई केली. विमानतळ परिसरात करोडो रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून एनसीबीने अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे.

 

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाने चर्चेत आलेल्या एनसीबीने विमानतळावर इंटरनॅशनल कुरिअर टर्मिनल सहार कार्गो कॉम्प्लेक्स येथून कथित ७०० ग्रॅम व्हाईट पावडर जप्त केली, हे हेरॉईन असल्याची माहिती आहे. ज्याची किंमत ४ कोटी रुपये आहे. याबाबत एनसीबीच्या मुंबईतील कार्यालयात चौकशी सुरू आहे, अशी माहिती एनसीबीने दिली आहे. 

एनसीबीने मंगळवारी (२ नोव्हेंबर) देखील विलेपार्के परिसरात मोठी कारवाई केली होती. एनसीबीने करोडो रुपयांचे हेरॉईन जप्त केले. कोट्यवधींचे हेरॉईन जप्त करण्याच्या या कारवाईची माहिती एनसीबीने दिली आहे. या प्रकरणातील संशयितांचा एनसीबी पथक शोध घेत आहे. एनसीबीच्या म्हणण्यानुसार या प्रकरणी अद्याप तपास सुरू आहे.

Advertisement

Advertisement