Advertisement

इन्शुरन्सचे ३७ कोटी रुपये मिळवण्यासाठी मनोरुग्णाची सर्पदंश देऊन हत्या

प्रजापत्र | Monday, 25/10/2021
बातमी शेअर करा

अहमदनगर-अहदनगरमध्ये इन्शुअरन्सचे 37 कोटी रुपये मिळवण्यासाठी चक्क एका मनोरुग्णाची हत्या करून स्वतःचा मृत्यू दखवण्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर येथे घडला आहे. अकोले तालुक्यातील राजूर पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला असून मुख्य आरोपी सह पाच जणांना अटक केली आहे.

पैसे मिळवण्यासाठी कोण काय करेल आणि कुठल्या पातळीवर जाईल याचा नेम नाही. अहमदनगरच्या अकोले तालुक्यातल्या राजूर मधील धामणगाव पाट या गावातील एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मागील वीस वर्षापासून अमेरिकेत स्वयंपाकीची नोकरी करणाऱ्या प्रभाकर वाकचौरे यांनी 2013 साली बायकोचा 10 लाख डॉलरचा आणि स्वतःचा 50 लाख डॉलरचा अमेरिकेत ऑल स्टेट इन्शुरन्स कंपनीकडे इन्शुरन्स काढला. इन्शुरन्सचा क्लेम मिळावा यासाठी प्रभाकर आपल्या गावी आला. आपल्या चार साथीदाराच्या मदतीने चार महिने नियोजन करून करून कट रचला. 

 एका मनोरुग्न व्यक्तीचा विषारी सापाच्या दंशाने खुन करून स्वतःचा मृत्यू झाल्याचे पुरावे तयार केले. हे पुरावे आणि कागदपत्र वाकचौरे याने इन्शुरन्स कंपनीकडे सादर केले. मात्र याची पडताळणी करताना या प्रकरणात काहीतरी गडबड असल्याचा संशय इन्शुरन्स कंपनीला आल्याने त्यांनी राजूर पोलिसांची मदत घेतली. राजूर पोलिसांनी तपास केला. त्यावेळी प्रभाकर वाकचौरे जिवंत असल्याचं समोर आलं. पोलिसांनी प्रभाकरला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर प्रभाकर आणि त्याच्या चार साथीदारांनी नवनाथ अनप या मनोरुग्णाची विषारी सापांच्या दंशाने हत्या केल्याची कबुली दिली आणि घडलेला सर्व धक्कादायक प्रकार समोर आला.प्रभाकर वाकचौरे याने इन्शुरन्सचे 37 कोटी रुपये मिळवण्यासाठी एका मनोरुग्ण व्यक्तीची हत्या केली आणि सर्व बनाव केला. या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Advertisement

Advertisement