Advertisement

लालबागमधील ‘वन अविघ्न पार्क’ला भीषण आग

प्रजापत्र | Friday, 22/10/2021
बातमी शेअर करा

लालबाग परिसरामधील वन अविघ्न पार्क या आलिशान इमारतीला आज दुपारी १२ च्या सुमारास भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशामन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ही आग लेव्हल तीनची असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

वन अविघ्न पार्क ही इमारत भारत माता थेअटर समोर आहे. लालबागमधील सर्वात उंच इमारतींपैकी एक असणारी ही इमारत ६० मजल्यांची असून १९ व्या मजल्यावर आग लागली आहे. आग लागल्यानंतर काहींनी खाली उड्या मारल्याची दृष्यही समोर आल्याचं एबीपीने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. एक व्यक्ती गॅलरीला लटकून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच खाली पडल्याचंही दिसून आलं आहे. पडलेली व्यक्ती सुरक्षारक्षक असल्याची माहिती समोर आलीय. स्थानिक आमदार अजय चौधरींनी ही प्राथमिक माहिती दिली आहे. पाचव्या माळ्यावर आग लागल्यानंतर ती पसरली आणि १९ व्या माळ्यापर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जात आहे.

 

या भागामधील गल्ल्या आणि रस्ते अरुंद असून अग्निशामन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहचायला वेळ लागू शकतो. तसेच आग १९ व्या मजल्यावर असल्याने तिथपर्यंत पोहचण्यास आखणीन वेळ लागण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

Advertisement

Advertisement