Advertisement

वंचित,उपेक्षितांसाठी रामकृष्ण बांगर प्रतिष्ठानची स्थापना

प्रजापत्र | Thursday, 14/10/2021
बातमी शेअर करा

बीड दि.१४ (प्रतिनिधी)-समाजातील वंचित,उपेक्षितांच्या सेवेसाठी रामकृष्ण बांगर प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील गोरगरिबांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती भायाळा गावाचे सरपंच विजयसिंह बाळा बांगर यांनी दिली. 
                कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत विजयसिंह बाळा बांगर यांनी माणुसकीच्या भावनेतून हजारो रुग्णांना मदत केली होती.कोणाला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाईल असेल अथवा आर्थिक मदत करायची असेल.बाळा बांगर यांनी सर्व पातळ्यांवर प्रभावीपणे काम करत आपल्या कार्याची छाप पडली होती.बीड जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा सारथी म्हणून त्यांची ओळख अलीकडच्या काळात त्यांच्या कार्यामुळे  झाली आहे.आता लोकांच्या अडीअडचणी आणि  समाजातील वंचित,उपेक्षितांच्या सेवेसाठी विजयसिंह बाळा बांगर यांनी आपल्या वडिलांच्या नावाने रामकृष्ण बांगर प्रतिष्ठानची स्थापना केली असून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी या प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्य करण्यात येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

 

रामकृष्ण बांगर प्रतिष्ठान अनेकांसाठी तारणहार ठरेल  
सर्वसामान्य लोकांच्या मागणीनुसार व विनंतीला मान देऊन माझ्या वडिलांच्या नावाने  रामकृष्ण बांगर प्रतिष्ठानची स्थापन करण्यात आली.आजपर्यंत सामाजिक कार्यात काम करत असताना माझ्या वडिलांचा डोळ्यासमोर आदर्श ठेवून कार्य सुरु होते.आता वडिलांच्या नावानेच प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आल्यामुळे एक वेगळाच आनंद झाला आहे.या प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदतीचा महायज्ञाला सुरुवात झाली असून गुरुवारी (दि.१४) प्रतिष्ठानाच्या सामाजिक कार्याची प्रथम सुरुवात जवळाला येथील ६ वर्षाच्या कर्णबधिर बालकाला कानयंत्र देऊन करण्यात आली.येणाऱ्या काळात रामकृष्ण बांगर प्रतिष्ठान अनेकांसाठी तारणहार ठरेल असा विश्वास मला आहे. 
विजयसिंह (बाळा) बांगर 
(सरपंच,भायाळा)

 

Advertisement

Advertisement