Advertisement

दिवाळीत 'लक्ष्मी बॉम्ब'चा धमाका, अक्षयकुमारकडून प्रदर्शनाची तारीख जाहीर.

प्रजापत्र | Thursday, 17/09/2020
बातमी शेअर करा

 अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आपल्या चित्रपटांमध्ये वेगळ्या प्रयोगांसाठी चर्चेत असतो. त्याच्या आगामी लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटाची देखील अशीच चर्चा सुरु आहे. कोरोनामुळं लांबलेलं या सिनेमाचं प्रदर्शन कधी होणार हा सवाल सिनेप्रेमींना होता. यावर खुद्द अक्षयकुमारनं उत्तर दिलं आहे. काल, बुधवारी त्यानं एक ट्वीट करत लक्ष्मी बॉम्बच्या रिलिज तारखेची घोषणा केली. सोबतच त्यानं एक टीझर देखील दिला आहे. हा सिनेमा आता दिवाळीत म्हणजे 9 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचं अक्षयनं म्हटलं आहे.

Advertisement

Advertisement