Advertisement

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. बाजारात विक्रीसाठी मोठा सेल लागला आहे. आता या सेलमध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट देखील आणलं आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे.केंद्र सरकारकडून काही केंद्रीय कंपन्या किंवा त्यातील हिस्सा विकण्याबाबतच्या हालचाली सुरु आहे. तसंच सहा कंपन्या बंद करण्यावर विचार सुरू असल्याची माहिती देखील आहे. या सर्व प्रकरणांवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकारनं बाजारात विक्रीसाठी खुप काही उपलब्ध केलंय. बाजारात विक्रीसाठी मोठा सेल लागला आहे. आता या सेलमध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट देखील आणलं आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे.

Advertisement

Advertisement