Advertisement

'तो' सांगडा महिलेचा

प्रजापत्र | Sunday, 03/10/2021
बातमी शेअर करा

अविनाश इंगावले 
राष्ट्रीय महामार्गावरील रांजणी जवळ एका नालीत मानवी सांगडा आढळून आल्याने रविवारी (दि.३) सकाळी खळबळ उडाली होती.गेवराई पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत तो सांगडा महिलेचा असून तिची ओळख देखील पटवली आहे.खून करून तिचा मृतदेह लपविण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज असून याप्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे.    
          राष्ट्रीय  महामार्गालगत असणाऱ्या रांजणी जवळील एका नालीत रविवारी (दि.३) सकाळी पोलिसांना मानवी सांगडा आढळून आला होता.गेवराई पोलीस ठाण्याचे जमादार ए.बी.शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली.नंतर गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तो सांगडा महिलेचा असल्याचे स्पष्ट केले.त्या सांगडा शेजारी साडी,कानातले,पैजन या वस्तूंवरून तिची ओळख देखील पटली असून राधा माणिक गायकवाड (वय-३४  रा.इंदेवादी जि.जालना) असे त्या महिलेचे नाव आहे.गेवराई पोलीसांनी जालना पोलिसांशी संपर्क करत मृत्यूदेहाची ओळख पटवली.दरम्यान आठ ते दहा दिवसापूर्वी तिचा खून करण्यात आला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.डीएनए अहवाल येणे बाकी आहे.यानंतर खरे कारण समोर येईल असे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप काळे यांनी म्हटले आहे. 

Advertisement

Advertisement