Advertisement

त्या सांगाडा सापडलेल्या महिलेची ओळख पटली |

प्रजापत्र | Sunday, 03/10/2021
बातमी शेअर करा

अविनाश इंगावले 

गेवराई-राष्ट्रीय महामार्गावरील रांजणी जवळ एका नालीत मानवी सांगडा आढळून आल्याने खळबळी उडाली.रविवारी (दि.३) गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून हा सांगडा महिलेचा असल्याचा अंदाज गेवराई पोलीस यांनी वर्तविला आहे.गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर ही सध्या घटनास्थळाकडे दाखल झाले होते राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या रांजणी गावाजवळ रस्त्यालगतच्या नालीत मानवी सांगडा आढळून आल्यानंतर गेवराई पोलिसांनी याची माहिती देण्यात आली.त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. साधारण आठ ते दहा दिवसापूर्वी महिलेचा खून करून मृतदेह इथे लपविण्यात आला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.सध्या पोलीस हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

 

याबाद सविस्तर माहिती अशी कि , महामार्गालगत असना -या नालीत एका मृत महिलेचा सांगाडा आढळुन आला होता हा सांगडा महिलेचा आहे असा अंदाज गेवराई पोलीसांनी वर्तविला होता तो अखेर खरा ठरला असुन या महिलेची ओळख पटली आहे , राधा माणिक गायकवाड ( वय ३४ ) राहनार इंदेवादी तालुका जिल्हा जालना असे या महिलेचे नाव असुन जालना तालुका पोलीस ठाण्यात या महिला बेपत्ता असल्याची नोंद होती यावरून गेवराई पोलीसांनी जालना पोलीस यांना संपर्क साधला व नातेवाईक गेवराई उपजिल्हा रूग्णयात आले व त्यांनी साडी , कानातले , पैजन , या दागिन्यावरून ओळख पटवली आहे तसेच शवविछेदन व डीएन ए करण्यासाठी शव अंबोजोईला रवाना करण्यात करण्यात येनार आहे घटनास्तळावर डॉ लोहकरे , डॉ राठोड , यांनी शव गेवराईच्या उपजिल्हा रूग्णलयात आनले याठिकाणी सहा पोनी संदिप काळे , जमादार शेळके , पो ना अमोल खटाने , यांनी पंचनामा केला आहे सदरील महिलेचा खुन केला असल्याचा अंदाज आहे या प्रकणाचा पुढील तपास सहा पोनी संदिप काळे करत आहेत

Advertisement

Advertisement