Advertisement

पोलीसांच्या कस्टडीतून आरोपीचे पलायन

प्रजापत्र | Friday, 24/09/2021
बातमी शेअर करा

गेवराई दि २४ ( वार्ताहार ) तलवाडा पोलीसांत वाळु चोरीचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला तलवाडा पोलीसांनी अटक केली होती त्याला गेवराई येथील न्यायलयासमोर हजर करण्यापुर्वीच आरोपीने पलायन केले असल्याची घटना घडली असुन त्यांच्या विरूद्ध गेवराई पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

    या बाबद सविस्तर माहिती अशी कि, तुकाराम कचुरबा आव्हाड ( वय ३४ वर्ष ) राहनार नित्रूड तालुका माजलगाव जि बीड असे या आरोपीचे नाव असुन यावर तलवाडा पोलीसांत वाळू चोरीचा गुन्हा दाखल होता याला अटक करून तलवाडा पोलीसांनी गेवराई न्यायलयात हजर करण्यासाठी आनले होते मात्र लगवी करून येतो असे सांगुन सदरचा आरोपी पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला मात्र आरोपीला न्यायलयात हजर करतांना पोलीसांना दक्षता घ्यावी लागते मात्र या घटनेमुळे असे सिद्ध होते की आरोपी व कसल्याही प्रकारची पळुन न  जाण्याची व्यवस्था तलवाडा पोलीसांनी केली नव्हती का ? असा प्रश्न उपस्तिथ होत असुन संबंधीत प्रकरणी गेवराई पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पो उप नी बोडखे करत आहेत .

Advertisement

Advertisement