गेवराई-तालुक्यातील मनुबाई जवळा येथील एका १९ वर्षीय तरुणाने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.२३) सकाळी समोर आली आहे.रागाच्याभरात त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे.
महेश जालिंदर कासार (वय-१९ रा.मनुबाई जवळा) असे मयत तरूणाचे नाव आहे.गेल्या तीन दिवसांपूर्वी तो घरातून रागराग निघून गेला होता.यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याचा नातेवाईकांकडे सर्वत्र शोध घेतला,मात्र तो मिळून आला नाही.अखेर गुरुवारी सकाळी माजलगाव येथील शिवनगाव येथील एका तलावात त्याचा मृतदेह आढळून आला.याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
बातमी शेअर करा