Advertisement

गावठी कट्यासह एक जिवंत काडतूस जप्त

प्रजापत्र | Tuesday, 21/09/2021
बातमी शेअर करा

गेवराई-बीड-जालना राष्ट्रीय महामार्गावरील साई धाब्यावर तिघे जण गावठी कट्टा घेऊन उभी असल्याची माहिती मिळाल्यानंतर गेवराई पोलीस ठाण्यातील डीबी पथक प्रमुख प्रफुल्ल साबळे यांनी कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले आहे.यावेळी गावठी कट्टा व व एक जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले. 
           राहुल दादासाहेब सोळसकर (वय-२२ रा. गढी), सय्यद आरबाज सय्यद निजाम (वय-२१ रा.गढी) दिपक राधाकिसन पवार (वय- २८ रा.राजंणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्या विरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई डीबी पथक प्रमुख प्रफुल्ल साबळे,श्री.देशमुख, श्री.जायभाये, श्री.नागरे,श्री.बहिरवाळ, श्री.खटाणे यांनी केली.

Advertisement

Advertisement