Advertisement

कोरोना संसर्गाचा आकडा वाढताच 158 पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Monday, 07/09/2020
बातमी शेअर करा

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होण्याचे नाव घेत नसून सोमवारी पाठविण्यात आलेल्या 1074 अहवालापैकी तब्बल 158 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई 28, आष्टी 12, बीड 36, परळी 18, माजलगाव 23, पाटोदा 4, वडवणी 14, धारुर 3, गेवराई 7, केज 9, शिरुर का.4 अशा अहवालांचा समावेश आहे. तर 916 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये आता ग्रामीण भागात कोरोना अधिक हातपाय पसरत आहे.

Advertisement

Advertisement