Advertisement

हनुमान महाराजांच्या जामिनावर उच्च न्यायालयाने काय दिला निर्णय ?

प्रजापत्र | Sunday, 22/08/2021
बातमी शेअर करा

 

 अविनाश इंगावले
गेवराई : बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तथा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली चकलांबा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी  कोळगाव येथील सुर्यमंदीर संस्थानाचे मठाधिपती हनुमान महाराज गिरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देखील फेटाळला आहे. बीडच्या सत्र न्यायालयाने महाराजांचा अटकपूर्व जमीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. बाळ लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या या महाराजांनी आत्महत्येचा इशारेरा देऊन काही काळ पोलीस प्रशासनाची देखील झोप उडविली होती.

 

 सुर्यमंदिर संस्थानाचे मठाधिपती हनुमान महाराज गिरी यांच्या विरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात  एका   अल्पवयीन मुलीचा विनयभंगणंग केल्याप्रकरणी बाळ लैंगिक अत्याचार अप्रतिबंधक कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आपण आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड झाल्यानंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती.माझ्या मृत्युला गावातील काही राजकीय व्यक्ती,पत्रकार,पीडित कुटूंब जबाबदार आहे अवघ्या पाच मिनिटात मी गळफास लावणार असल्याचा व्हिडीओ व्हयरल करून हनुमान महाराज गिरी हे पसार झाले.मात्र सलग तीन दिवस पोलीस प्रशासन त्यांना शोधत होते .

 

महारांजाच्या नातेवाईकांकडून  हनुमान महाराज जिवंत असल्याची पुष्टी पोलीसांना झाल्यानंतर त्यांनी शोध मोहिम थांबवली परंतू पोलिसांनी गुंगारा देणारा हनुमान महाराज गिरी अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही.हनुमान महाराज गिरी यांनी मागील काही दिवसांपुर्वी  बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यावर दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्यासमोर सुनावणी झाली, मात्र न्यायालयाने हनुमान महाराज गिरी यांना अटकपूर्व जमीन द्यायला नकार दिला त्यामुळे महाराज यांच्या अडचणीत वाढ झाली होती मात्र हनुमान महाराज यांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपिठ औंरगाबाद याठिकाणी अटपुर्व जामिन साठी अर्ज केला होता मात्र खंडपीठानेही  त्यांचा जामिन अर्ज फेटाळला आहे आता कोणत्याही क्षणी हनुमान महाराजाला अटक होऊ शकते .

 

 

 

Advertisement

Advertisement