गेवराई दि.२१ ( वार्ताहार ) तालुक्यातील श्रींगारवाडी येथील विवाहित महिलेवर नाते संबंधातील व्यक्तिने सोशलमिडीयावर फोटो अपलोड करण्याची धमकी देऊन शेतात मध्ये काम करत असताना जवळ कोणी नसल्याची संधी साधुन एका ( २८ वर्षीय ) महिलेवर बलात्कार केल्याची घटना चंकलाबा पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे .
सविस्तर माहिती अशी कि , विवाहित महिलेला शेतात एकटी पाहून तिचे फोटो आरोपीने काढून सोशलमिडीयावर व्हॉयरल करण्याची धमकी दिली व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याची फिर्याद पीडीत महिलेच्या वतीन चंकलाबा पोलीसांत दिली आहे . सदर प्रकरणातील आरोपीस पोलिस उपनिरिक्षक डी. बी पवार यांनी ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे सदरच्या आरोपीचे नाव विक्रम काळे असल्याचे सांगण्यात येत असुन या प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक ए. डी . भोसले करत आहेत .
बातमी शेअर करा