Advertisement

अज्ञात चोरट्याने टपरी फोडली 

प्रजापत्र | Thursday, 19/08/2021
बातमी शेअर करा

 

 

बीड दि.१९ (प्रतिनिधी ) - शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माने कॉम्प्लेक्स समोरील टपरी अज्ञात चोरट्याने फोडून टपरीत असलेला अँपल  कंपनीचा एक मोबाईल, बावीस हजाराचे सिगारेट व गल्ल्यातील रोखरक्कम असा एकूण ६४ हजार रूपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. या प्रकरणी विशाल किसनराव गाडे यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल गाडे यांच्या आईची तब्येत खराब असल्याने ते टपरी बंद ठेवून आईला दवाखान्यात घेवून गेले होते. याचाच फायदा चोरट्याने घेवून टपरी फोडली.

 

 

हेही वाचा... 
 आज कोरोनाची शंभरी पार
http://prajapatra.com/2915
 

 

 

Advertisement

Advertisement