Advertisement

शाळा राहणार बंद

प्रजापत्र | Thursday, 12/08/2021
बातमी शेअर करा

 

 

मुंबई - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. येत्या १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यात येतील असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याची घोषणा केली होती. मात्र टास्क फोर्सच्या बैठकीत शिक्षण विभागाच्या या निर्णयाला विरोध करण्यात आला असून शाळा तूर्तास तरी बंद राहणार असल्याचे चित्र आहे. 
           टास्क फोर्सनं शिक्षण विभागाच्या निर्णयावर आक्षेप घेतला.यामुळे आता शाळा सुरु होण्याच्या जीआरला स्थगिती देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मंत्र्यांनी शाळा सुरू होण्याबाबत आक्षेप घेतला होता. शाळा सुरू झाल्यावर कोविड रुग्णांची संख्या वाढू शकते अशी भीती मंत्र्यांनी व्यक्त केली होती. मात्र शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्यावर भर दिला. मात्र आजच्या (दि.१२) टास्क फोर्सच्या बैठकीत शाळा सध्या तरी सुरु करू नका अश्या सूचना दिल्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तुर्तास हा निर्णय थांबवला असल्याची माहिती दिली होती. 

 

 

 

Advertisement

Advertisement